देव होसी जरी – संत तुकाराम अभंग – 794
देव होसी जरी आणिकांते करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥१॥
दुष्ट होती तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥२॥
तुका म्हणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥३॥
अर्थ
जर तू देव झालास तर तू दुसऱ्याला देव करशील यात कोणतीही शंका नाही.जर तू दृष्ट झाला तर तू दुसऱ्याला हि दृष्ट करशील यातही काही शंका नाही.तुकाराम महाराज म्हणतात जसे आरश्यात दिसते तसेच बाहेर असते त्याप्रमाणे माणसाचा स्वभाव कसा असतो हे त्याच्या वागण्यावरू समजते यात काही शंका नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
देव होसी जरी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.