विचार नाहीं नर खर – संत तुकाराम अभंग – 793

विचार नाहीं नर खर – संत तुकाराम अभंग – 793


विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥१॥
वादावाद करणें त्यासी तोचि वरी । गुखाडीची चाड सरे तोंचि बाहेरी ॥ध्रु.॥
सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । छी करूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥२॥
नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥३॥

अर्थ

जो मनुष्य विचार शून्य आहे तो गाढवासमान आहे तो ब्रम्हज्ञानी जरी असला तरी त्याचे शब्दज्ञान हे बैलाच्या पाठीवरी ओझ्या प्रमाणे आहे.त्याला वादावाद करणे आवड असून कायम बाह्यारूपी विष्ठा खाण्याची सवय असते.तो कितीही श्रीमंत असला,विद्वान असला तरी पायाला लागलेली घाण जशी छी करून काढून टाकावी त्याप्रमाणे त्याचा त्याग करावा. तुकाराम महाराज म्हणतात त्याचे कुळ कितीही उच्च असले तरी लक्षात घेवू नये आणि त्याची माळ मुद्रा इत्यादी लक्षणे खोटी आहेत हे समजावे,ती काय जाळायची आहेत?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

विचार नाहीं नर खर – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.