सुरवर येती तीर्थे – संत तुकाराम अभंग – 792

सुरवर येती तीर्थे – संत तुकाराम अभंग – 792


सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥१॥
साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥
पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥२॥
निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रह्मानंदु ॥३॥
तुका म्हणे ज्यापें नाहीं पुण्यलेश । जा रे पंढरीस घेई कोटि ॥४॥

अर्थ

सर्व देवी देवता हि या पंढरपुरी तीर्थी चंद्रभागारूपी शुद्ध पेठेत येतात.हि गोष्ट सांगू वांगी नसून प्रत्यक्ष माझा अनुभव आहे या पेठेचा अद्भूत महिमा वर्णानच करता येत नाही.या पंचक्रोशीमध्ये दोषांचा विषय येतच नाही आणि जरी फार मोठा दोष असला तरी तो इथे आल्यावर अपोआप जळून जातो.येथील सर्व पुरुष आणि स्त्रीया चतुर्भुज व निर्विषय देवा प्रमाणे विषयहीन आहेत.येथे सर्व घरोघरी ब्रम्हानंद आहेत.तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या जवळ पुण्याचा लवलेश हि नाही त्यांनी पंढरीस जावून कोटी कोटी पुण्य घावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

सुरवर येती तीर्थे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.