द्वारकेचें केणें आलें – संत तुकाराम अभंग – 791

द्वारकेचें केणें आलें – संत तुकाराम अभंग – 791


द्वारकेचें केणें आलें याचि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥१॥
गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥
वैष्णव मापारी नाहीं जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥२॥
लाभ जाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांठविलें ॥३॥
तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥४॥

अर्थ

भक्त राज पुंडलिक हा लोकांना सांगत आहे कि द्वारकेतून श्री कृष्ण रुपी माल या पंढरीच्या बाजारात आला आहे.भक्तांनी विसार देवून श्री कृष्ण रुपी माल हा ताब्यात घेतला आहे.त्याचे माप खरे केले आहे व त्याची किंमत मोजली आहे त्या कारणाने तो परमात्मा अजून माघारी पाहत नाही.वैष्णव जन त्याचे माप घेतात,परंतु त्याचे काही मोज माप च होवू शकले नाही आणि पुढे त्याचा काही पत्ता लागत नाही.ज्यांनी तो माल घेतला त्यांनी त्या मालाचा विचार करून इहलोक व परलोकी तो माल साठविला आहे.तुकाराम महाराज म्हणतात मला मजुरी मिळाली आहे आणि माझा संतांवर पूर्ण विश्वास आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

द्वारकेचें केणें आलें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.