पंढरीस दुःख न मिळे – संत तुकाराम अभंग – 790

पंढरीस दुःख न मिळे – संत तुकाराम अभंग – 790


पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥
पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥
उदिमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥२॥
पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥३॥
तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥४॥

अर्थ

पंढरीस दुखः हे औषधालाही मिळत नाही कारण सुख पांडुरंग रूपाने तेथे असल्या मुळे.पंढरीत पेठ हि पुंडलीकाने वसवली असून त्याने सर्व वैकुंठच या पृथ्वीवर आणले आहे.या ठिकाणी कोणत्याही धंद्याला काहीच तोटा नाही,सर्वांना फायदाच फायदा आहे.या पेठेत सर्व देशाला पुरेल एवढा माल आहे तो माल शीग पर्यंत भरलेला आहे.या मालाने सर्व पंचक्रोशी दुमदुमून गेली आहे.तुकाराम महाराज म्हणतात संतांना पंढरीत तृप्ती मिळाली आहे,कारण कारण त्यांना येथे पांडूरंगाच्या प्रेम सुखाचा लाभ प्राप्त झाला आहे म्हणून ते पंढरीत बसून राहिले आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

पंढरीस दुःख न मिळे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.