गति अधोगति मनाची – संत तुकाराम अभंग – 789

गति अधोगति मनाची – संत तुकाराम अभंग – 789


गति अधोगति मनाची हे युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥१॥
जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥
मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तेचि करी ॥२॥
तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौऱ्यांशीचा ॥३॥

अर्थ

गती अधोगती हि मनाचीच युक्ती आहे,त्यामुळे मन हे एकांती व साधूच्या संगतीत लावावे.या मनाचे जतन करा या मनाचे जतन करा ते ओढाळ जनावरा प्रमाणे सैरावैरा इतस्तः धावत आहे.मान आणि अपमान हे मनाच्या वृत्तीचे लक्षण आहेत,त्यामुळे मनाला ज्या प्रकारचे ध्यान लावावे तेच ते करते.तुकाराम महाराज म्हणतात अहो माझे बंधुंनो हे मनच आहे की जे आपल्याला भवसागरातून उतरवते आणि हे मनच आपल्याला चौर्‍यांशी लक्ष योनीच्या फेऱ्यात बांधून टाकते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

गति अधोगति मनाची – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.