दास झालों हरीदासांचा – संत तुकाराम अभंग – 788

दास झालों हरीदासांचा – संत तुकाराम अभंग – 788


दास झालों हरीदासांचा । बुद्धीकायामनें वाचा ॥१॥
तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ ।
नासे दुष्टबुद्धी सकळ । समाधि हरीकीर्त्तनीं ॥ध्रु.॥
ऐकतां हरीकथा । भक्ती लागे त्या अभक्तां ॥२॥
देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥३॥
हें सुख ब्रह्मादिका । नाहीं नाहीं म्हणे तुका ॥४॥

अर्थ

काय,वाचा,मानाने व बुद्धीने मी हरी दासांचाही दास झालो आहे.जेथे प्रेमाचा सुकाळ आसतो,टाळ मृदुंगाचा जय घोष असतो,तेथे दुष्ट बुद्धी नाहीशी होते,व हरी कीर्तनात समाधी लागते.हरी कथा ऐकल्याने अभक्तालाही भक्ती उत्पन्न होते.कीर्तनाचा रंग पाहून पांडुरंग तेथे कसा उभा राहतो ते पहा?अश्या प्रकारचे सुख हे देवादिकांनाही मिळत नाही असे महाराज दोन वेळा सुचवतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

दास झालों हरीदासांचा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.