भोजन पा शांतीचें – संत तुकाराम अभंग – 787

भोजन पा शांतीचें – संत तुकाराम अभंग – 787


भोजन पा शांतीचें । उंच निच उसाळी ॥१॥
जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥ध्रु.॥
कल्पना ते देवाविण । करी भिन्न इतरीं ॥२॥
तुका म्हणे पावे भूती । ते निंश्चिती मापली ॥३॥

अर्थ

भोजन असे सेवन करावे जेणे करून मनाला शांती लाभली पाहिजे,मनात शांतीच्या लाटा उसळल्या पाहिजे.ज्या प्रमाणे कारंज्याचे पाणी हे उंचच उंच उडते तसा प्रेमाचा जिव्हाळा मनात हवा म्हणजे स्वहित लाभेल.देवाविण इतर कोणतेही विचार मानत येऊ देऊ नका.तुकाराम महाराज म्हणतात शांतीचे स्वरूप मी तुमच्या समोर आता मांडले आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

भोजन पा शांतीचें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.