अभिमानाची स्वामिनी – संत तुकाराम अभंग – 786
अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व येती सकळ ॥१॥
कळोनि ही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥ध्रु.॥
सर्व सत्ता धरितां धीर । वीर्या वीर आगळा ॥२॥
तुका म्हणे तिखट तिखें । मृद सखे आवडी ॥३॥
अर्थ
अभिमानाची निवृत्ती हि शांतीनेच होत असते,त्यामुळे एका शांतीने सर्वांना महत्व मिळते.सर्वांना हे माहित असून त्याचे अनुकरण कोणीही करत नाही,त्यामुळे सर्वांना कष्ट होतात.परमार्थात धीर जो कोणी धरतो तोच सर्वां मध्ये महावीर आहे असे समजलेच पाहिजे.तुकाराम महाराज म्हणतात संत हे जे कोणी त्यांच्याशी तिखट प्रमाणे वागतात त्यांच्याशी ते कठोर वागतात आणि जे त्यांच्याशी कोमल प्रमाणे वागतात ते त्यांच्याशी अति कोमलतेने वागतात असतात आणि तितकेच मृदू आणि मधुर असतात,म्हणूनच तर ते माझी सखी आहेत, मला फार आवडतात.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
अभिमानाची स्वामिनी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.