जीवित्व तें किती – संत तुकाराम अभंग – 785

जीवित्व तें किती – संत तुकाराम अभंग – 785


जीवित्व तें किती । हेचि धरितां बरें चित्तीं ॥१॥
संत सुमनें उत्तरें । मृदु रसाळ मधुरें ॥ध्रु.॥
विसांवतां कानीं । परिपाक घडे मनीं ॥२॥
तुका म्हणे जोडी । होय जतन रोकडी ॥३॥

अर्थ

आपले आयुष्य ते किती आहे,हे आपल्या चित्तात धरले तर बरे.संतांची शब्दरूपी सुमने म्हणजे फुले हि मृदु रसाळ आणि मधुर आहेत.ती वचने ऐकली तर मनतृप्त होऊन परिपक्व होते.तुकाराम महाराज म्हणतात ज्याने रोकड हातात येते ते साधन संग्रहात ठेवावे हे बरे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जीवित्व तें किती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.