धन्य शुद्ध जाती – संत तुकाराम अभंग – 784

धन्य शुद्ध जाती – संत तुकाराम अभंग – 784


धन्य शुद्ध जाती । धरीं लौकरी परती ॥१॥
ऐकिलें तोचि कानीं । होय परिपाक मनीं ॥ध्रु.॥
कळवळा पोटीं । सावधान हितासाठीं ॥२॥
तुका म्हणे भाव । ज्याचा तोचि जाणा देव ॥३॥

अर्थ

जो मनुष्य संसारातून परतीची वाट लवकर धरतो तो मनुष्य धन्य आहे,त्याची जाती व कुळ धन्य आहे.या आश्या मनुष्याच्या कानी परमार्थाचे नुसते काही विचार जरी पडले तर ते विचार त्याच्या मनात व हृदयात पूर्ण पणे ठसतात.त्याच्या हृदयात इतरां साठी कळवळा उत्पन्न होऊन तो इतरांच्या हितासाठी जागा होतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनामध्ये सं रविषयी आदर आहे आणि परमार्थ विषयी चांगले विचार आहे तोच देव आहे असे समजावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

धन्य शुद्ध जाती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.