आइत्याची राशी – संत तुकाराम अभंग – 783
आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥१॥
आतां सोडोनि भोजन । भिके जावें वेडेपण ॥ध्रु.॥
उसंतिली वाट । मागें परतावें फुकट ॥२॥
तुका म्हणे वाणी । वेचों बैसोन ठाकणीं ॥३॥
अर्थ
एखाद्या माणसासमोर आयते चालून पक्वनाचे ताट वाढून आले व तो ते ताट सोडून भिक मागावयास गेला तर तो मनुष्य वेडा ठरेल.एखादी वाट चालून आल्यावर परत मागे चालून जाणे हे व्यर्थ असते. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एका ठिकाणी बसून आवडीने हरीचे नाम घेवू.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आइत्याची राशी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.