आम्ही आळीकरें – संत तुकाराम अभंग – 782
आम्ही आळीकरें । प्रेमसुखाचीं लेंकरें ॥१॥
पायीं गोविली वासना । तुच्छ केलें ब्रम्हज्ञाना ॥ध्रु.॥
येतां पाहें मुळा । वास पंढरीच्या डोळां ॥२॥
तुका म्हणे स्थळ । मग मी पाहेन सकळ ॥३॥
अर्थ
आम्ही देवा जवळ हट्टाने मागणी मागणारे प्रेम सुख मागणारे लेकरे आहोत. आमच्या सर्व काही वासना या हरीच्या ठिकाणी असून ब्रम्हज्ञान देखिल आम्हाला तुच्छ आहे.पांडुरंग आम्हाला पंढरीवरून केव्हा बोलवील ह्याची आम्ही वाट पाहत आहोत.तुकाराम महाराज म्हणतात एकदा कि मला देवाने पंढरी क्षेत्राला नेले तर मग मी सर्व क्षेत्र स्थळ पाहीन.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आम्ही आळीकरें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.