ज्या ज्या आम्हांपाशीं – संत तुकाराम अभंग – 781
ज्या ज्या आम्हांपाशीं होतील ज्या शक्ती । तेणें हा श्रीपती अळंकारूं ॥१॥
अवघा पायांपाशीं दिला जीवभाव । जन्ममरणाठाव पुसियेला ॥ध्रु.॥
ज्याचें देणें त्यासी घातला संकल्प। बंधनाचें पाप चुकविलें ॥२॥
तुका म्हणे येथें उरला विठ्ठल । खाये बोल बोल गाये नाचे ॥३॥
अर्थ
आमच्यात असलेल्या सामर्थ्याच्या शक्तीने आम्ही श्रीपतीला अलंकार घालू.आम्ही त्या श्रीपतीच्या पायापाशी जीवभाव अर्पण केला आहे त्या योगाने आम्ही जन्ममरणाचा ठावठिकाणा पुसून टाकला आहे.आम्ही जो संकल्प केला होता तो संकल्प देवाला अर्पण केला असून बंधनाचे सर्व पाप चुकविले आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आता विठ्ठलाचा सर्व काही अर्पण केले त्यामुळेच केवळ विठ्ठलाच भरलेला आहे ,तो देईल ते आम्ही खातो त्याचेच बोल बोलतो त्याचीच गाणी गातो आणि त्याच्याच छंदात नाचतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
ज्या ज्या आम्हांपाशीं – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.