वेश वंदाया पुरते – संत तुकाराम अभंग – 780
वेश वंदाया पुरते । कोण ब्राम्हण निरुते ॥१॥
ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितों येविशी ॥ध्रु.॥
असा जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्धहीण ॥२॥
तुका म्हणे लोपें । सत्याचिया घडती पापें ॥३॥
अर्थ
आचार भ्रष्ट असलेले ब्राम्हणाने परिधान केलेला वेश म्हणजे फक्त त्यांना नमस्कार करण्यापुरता आहे. मग ते ब्राम्हण आहेत का?संताना हा प्रश्न मी विचारीत असून त्यांनी याचे मला उत्तर द्यावे सर्व ग्रंथात तुम्ही प्रवीण आहात तुम्हाला चांगले आणि वाईट कळते.तुकाराम महाराज म्हणतात सत्य लोपले कि पाप अपोआप घडते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
वेश वंदाया पुरते – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.