विश्वाचा जनिता – संत तुकाराम अभंग – 78

विश्वाचा जनिता – संत तुकाराम अभंग – 78


विश्वाचा जनिता ।
म्हणे यशोदेसि माता ॥१॥
ऐसा भक्तांचा अंकित ।
लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥
निष्काम निराळा ।
गोपी लावियेल्या चाळा ॥२॥
तुका म्हणे आलें ।
रूपा अव्यक्त चांगलें ॥३॥

अर्थ
या विश्वाचा जनक यशोदेला माता म्हणतो .तो भक्तांचा अंकित आहे, भक्ताला त्याच्या भक्तीप्रमाणे प्रेम देत असतो .परमेश्वर निष्काम असूनही गोपीनां त्याचा वेध लागला आहे .तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या भक्तीसाठी तो अव्यक्त असुन व्यक्त, सगुन साकार रूपामधे आला आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


विश्वाचा जनिता – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.