मातेचीं जो थानें फाडी – संत तुकाराम अभंग – 779

मातेचीं जो थानें फाडी – संत तुकाराम अभंग – 779


मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥
वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥
अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥२॥
तुका म्हणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥३॥

अर्थ

ज्या मातेच्या दुधापासून आपले रक्षण होते त्या मातेचे स्थन फाडणे जसे पापच आहे.त्याप्रमाणे वेदाला जो कोणी निंदितो तो चांडाळ,पापी,अज्ञानी आहे असे समजावे.जो स्वतः आपल्याच घरला आग लावतो तो कुठे विश्रांती घेणार?तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा वर्म जाणून घेतला पाहिजे इतरांना तर भ्रम नाचवितात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

मातेचीं जो थानें फाडी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.