बीजापोटीं पाहे फळ – संत तुकाराम अभंग – 778
बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥१॥
तया मूर्ख म्हणावें वेडें । कैसें तुटेल सांकडें ॥ध्रु.॥
दावितिया वाट । वेठी धरूं पाहे चाट ॥२॥
पुढिल्या उपाया । तुका म्हणे राखे काया ॥३॥
अर्थ
जमिनीची कुठल्याही प्रकारची निगा न करता(नांगरणी,खुरपणी,बि पेरणे इ.)जो फक्त फळाची अपेक्षा करतो,अशा माणसांना मूर्ख म्हणावे.त्याची पुढील संकटे कशी नाहीशी होतील?जो मार्ग दाखवितो त्यालाच वेठबीगारीला जो धरतो,असा माणूस निंद्य होय.तुकाराम महाराज म्हणतात पुढे ईश्वर प्राप्ती करून घेण्यासठी शरीराचे रक्षण करावे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
बीजापोटीं पाहे फळ – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.