कांहीं जाणों नये – संत तुकाराम अभंग – 777

कांहीं जाणों नये – संत तुकाराम अभंग – 777


कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहानें ॥१॥
भलतिया नावें आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥ध्रु.॥
अहंकार जातो गौरवितां वाणी । सर्वगात्रा धणी हरीकथा ॥२॥
तुका म्हणे उपजे विल्हाळ आवडी । करावा तो घडीघडी लाहो ॥३॥

अर्थ

पांडुरंगाशिवाय दुसरा काही विचार करू नये पांडुरंगा विषयी काही संदेह केला तर त्रास होईल.कोणत्याही नावाने जगाचा पिता विठ्ठलाला आळविले किंवा हाक मारली तरी तो आपल्या मनातील कळवळा जाणून घेत असतो.विठ्ठलाचे नाम आळवले तर आपली वाणी शुद्ध होवून सुरक्षित होवून अहंकार नाहीसा होतो. हरिकथेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात.तुकाराम महाराज म्हणतात आपल्या हृदयात पांडुरंगाची आवड कशी निर्माण होईल,याचाच विचार घडोघडी करावा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

कांहीं जाणों नये – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.