भ्रमना पाउलें वेचतातीती – संत तुकाराम अभंग – 776
भ्रमना पाउलें वेचतातीती वाव । प्रवेशाचा ठाव एका द्वारें ॥१॥
सार तीं पाउलें विठोबाचीं जीवीं । कोणीं न विसंभावीं क्षणभरि ॥ध्रु.॥
सुलभ हें केलें सकळां जीवन । फुंकावेचि कान न लगेसें ॥२॥
तुका म्हणे येथें सकळ ही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचें ॥३॥
अर्थ
सर्व साधनांच्या मागे फिरत राहण्यात भ्रमण करण्यात कायअर्थ आहे हरी कडे जाण्याचे द्वार तर एकच आहे. सर्व गोष्टीचे सार म्हणजे विठ्ठलाचे पाऊले ते आपल्या हृदयात स्थिर करावी कोणीही त्याला एक क्षणभर विसरू नये.हे सर्वात सोपे व उत्तम साधन आहे.यासाठी गुरुकडून कान मंत्र घेणे आवश्यक नाही.तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी सर्व इच्छा पूर्ण होत आहे.म्हणजे हरीचे चरणच सर्व विस्ताराचे मूळ खोड आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
भ्रमना पाउलें वेचतातीती – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.