ठेविलें जतन – संत तुकाराम अभंग – 775

ठेविलें जतन – संत तुकाराम अभंग – 775


ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥१॥
जयापासाव उत्पत्ती । तें हें बीज धरिलें हातीं ॥ध्रु.॥
निवडिलें वरळा भूस । सार आइन जिन्नस ॥२॥
तुका म्हणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥३॥

अर्थ

हरीच्या प्राप्तीचे नीज धन मी जतन करून ठेवले आहे.ज्यापासून सर्व जगाची उत्पत्ती आहे ते बीजच मी हाती धरले आहे.मी फोलपाट(भुसा) बाजूला सारून हरीची निवड केली आहे.तुकाराम महाराज म्हणतात तो नारायण माझ्या भाग्यात आला हे माझ्या संचिताचे गुण आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

ठेविलें जतन – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.