नाहीं येथें वाणी – संत तुकाराम अभंग – 774

नाहीं येथें वाणी – संत तुकाराम अभंग – 774


नाहीं येथें वाणी । सकळां वर्णी घ्यावी धणी ॥१॥
जालें दर्पणाचें अंग । ज्याचा त्यासी दावी रंग ॥ध्रु.॥
एका भावाचा एकांत । पीक पिकला अनंत ॥२॥
तुका खळे दाणीं । करी बैसोनी वांटणी ॥३॥

अर्थ

सर्व प्रकारचे उच नीच साधकांनी ईश्वर लाभाची प्राप्ती करून घ्यावी भक्ती मार्गात कशचीच उणीव नसते भक्ती मार्ग असा असतो अगदी आरश्या प्रमाणे ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला फळ प्राप्त होते प्रतीबिंबासारखे. एक निष्ठ भक्तीभाव असला तर त्याठिकाणी हरी कृपेचे पिक अनंत असते.तुकाराम महाराज म्हणतात मी या भक्तीच्या पिकाचे खळे करून बसलो आहे व ज्याचा जसा भाव असेल त्याला त्या प्रकारच्या लाभाची वाटणी करत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

नाहीं येथें वाणी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.