साधनांच्या कळा आकार – संत तुकाराम अभंग – 773

साधनांच्या कळा आकार – संत तुकाराम अभंग – 773


साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥१॥
पक्षियासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासीचि पावे ॥ध्रु.॥
भक्तीची जोडी ते उखत्याचि साठी । उणें पुरें तुटी तेथें नाहीं ॥२॥
तुका म्हणे आलें सांचत सांचणी । आजि जाली धणी एकसरें ॥३॥

अर्थ

पुरातन काळापासून ईश्वर प्राप्तीसाठी विविध कलांचा(साधनांचा) वापर केला जात होता त्या सर्वांचे मंथन करून एकच सार काढले आहे ते म्हणजे “भक्ती”.पक्ष्यांना त्यांच्या मार्गात काही अडथळा येत नाही उंचावर असल्यामुळे ते फळाला लवकर भिडतात.तसेच भक्तीचे आहे इतर साधने क्रमाक्रमाने हरीची प्राप्ती करून देतात पण भक्ती हि एक अशी साधना आहे कि तेथे काही कमी पडू देत नाही.भक्ती ने हरीची प्राप्ती लवकर होते.तुकाराम महाराज म्हणतात माझा पुण्याचा साठाच साचत आहे त्यामुळे आज भक्ती प्रकट झाली व हरीची प्राप्ती झाली.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

साधनांच्या कळा आकार – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.