मीचि मज व्यालों – संत तुकाराम अभंग – 772
मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥
आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥
जालों बरा बळी । गेलों मरोनि तेकाळीं ॥२॥
दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥
अर्थ
मीच माझ्या पोटी जन्माला आलो आहे,मी ब्रम्ह आहे या भावनेने माझा जन्म माझ्या पोटी झाला आहे.आता माझे नवस पूर्ण झाला आहे सर्व प्रकारची अशा निरसून गेली आहे. मी बलवान (मी ब्रम्ह आहे) झालो आहे तेव्हा माझी “मी देह” आहे हे वृत्ती नाहीशी झाली आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी ब्रम्ह असल्यमुळे प्रपंच व परमार्थाकडे साक्षी रूपाने पाहत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
मीचि मज व्यालों – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.