जग अवघें देव – संत तुकाराम अभंग – 771

जग अवघें देव – संत तुकाराम अभंग – 771


जग अवघें देव । मुख्य उपदेशाची ठेव ॥१॥
आधीं आपणयां नासी । तरि उत्तरे ये कसीं ॥ध्रु.॥
ब्रम्हज्ञानाचें कोठार । तें या निश्चयें उत्तर ॥२॥
तुका म्हणे ते उन्मनी । नाश कारय कारणीं ॥३॥

अर्थ

अध्यात्मातील प्रमुख उपदेश म्हणजे संपूर्ण विश्व हेच भगवंताचा लीला विलास आहे.प्रथम अहंकार नाहीसा कर म्हणजे मग,तू खऱ्या कसला लागशील.”अहम ब्रम्हास्मि” या उपदेशातच सर्व ब्रम्हज्ञानाचे भांडार भरले आहे.तुकाराम महाराज म्हणतात ज्या ठिकाणी कार्य आणि कारण हे भावच नाहीसे होतात तीच उन्मनी अवस्था होय.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जग अवघें देव – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.