बोलावा विठ्ठल पाहावा – संत तुकाराम अभंग – 770
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥
बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥२॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥३॥
अर्थ
विठ्ठलाचे नाम घ्यावे,विठ्ठलाला डोळे भरून पाहावा,त्याच्यावर जीव अर्पण करावा.या विठ्ठलाच्या चरणांचि इतकी हाव लागली आहे की आता या प्रपंचाकडे मन माघारी धांव घेत नाही.मी संसाररूपी सागरातून मुक्त झालो आहे त्यामुळे मला विठ्ठलाच्या चरणांची सावकाश मिठी घेता आली आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या हृदयात विठ्ठल परिपूर्ण भरलेला आहे त्यामुळे काम आणि क्रोध यांनी माझे हृदय रुपी घर रिते केले म्हणजे खाली केले.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
बोलावा विठ्ठल पाहावा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.