वचनांचे मांडे दावावे – संत तुकाराम अभंग – 766

वचनांचे मांडे दावावे – संत तुकाराम अभंग – 766


वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥१॥
जातां घरा मागें उरों नेणें खंती । मिळाल्या बहुतीं फांकलिया ॥ध्रु.॥
उदयींच अस्त उदये संपादिला । कल्पनेचा केला जागेपणें ॥२॥
जाणवूनि गेला हांडोरियां पोरां । सावध इतरां करुनी तुका ॥३॥

अर्थ

लहान मुले जर भातुकलीचा खेळ खेळावयास जमली तर त्यांचे सगळे पदार्थ हे शब्दांनीच तयार होतात.ते खरे असते का?तो खेळ संपल्यावर मुले घरी निधून जातात व नंतर त्यांच्या मनात तो भातुकलीचा खेळ देखील राहत नाहि.दिवसा ते आपल्या कल्पनेनेच रात्र झाली असे मानून झोपतात थोड्या वेळाने दिवस उगवला आहे असे कल्पना करून उठतात.तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचाचा असाच खेळ आहे म्हणून मी तुम्हाला सावध करतो आहे तुम्ही सावध व्हा हरी नाम घ्या.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

वचनांचे मांडे दावावे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.