भक्तीचिया पोटीं रत्नाचिया – संत तुकाराम अभंग – 763

भक्तीचिया पोटीं रत्नाचिया – संत तुकाराम अभंग – 763


भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी । ब्रम्हीची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥
माउलीचे मागें बाळकांची हारी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥
जेथील जे मागे ते रायासमोर । नाहींसें उत्तर येत नाहीं ॥२॥
सेवेचिये सत्ते धनीच सेवक । आपुलें तें एक न वंची कांहीं ॥३॥
आदिअंत ठाव असे मध्यभाग । भोंवतें भासे जग उच्चांसनी ॥४॥
भावारूढ तुका झाला एकाएकीं । देवचि लौकिकीं अवघा केला ॥५॥

अर्थ

भक्तीच्या पोटात ब्रम्हपद,ज्ञान या रत्नांच्या खाणी आहेत.ज्या प्रमाणे आईच्या मागे बालकांची रीघ असते त्या प्रमाणेही या विठ्ठलच्या मागे भक्तांची रांग असते.राजा समोर कोणी काही जरी मागितले तर ते राजा देतो,तो कधीही नाही म्हणत नाही त्याच्या कडे नाही हे उत्तर नसते.सेवकाने जर धन्याची मनापासून सेवा केली तर तोच सेवक काही कालांतराने धनी बनतो कारण राजा त्याच्या सेवेला आतिशय भारावलेला असतो व त्याला सर्व अधिकार द्यायलाही काहीच विचार करत नाही.त्या प्रमाणे देवाच्या सेवेला जो कोणी नाही म्हणत नाही तो परमेश्वर त्याला ते सर्व अधिकार देतो मग तो सेवक एकदा कि उच्चासनावर बसला तर त्याला सर्व आदी मध्य अंत(उत्तम मध्यम कनिष्ट) कळते,तुकाराम महाराज म्हणतात मी भक्ती भावाच्या बळावर सिंहासनावर आरूढ झालो आहे,साऱ्या लौकिक गोष्ठी मला देव रूपच दिसत आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

भक्तीचिया पोटीं रत्नाचिया – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.