याजसाठी केला होता – संत तुकाराम अभंग – 762

याजसाठी केला होता – संत तुकाराम अभंग – 762


याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥

अर्थ

परमेश्वराची साधना आयुष्य भर केली ती याच साठी की शेवटचा दिवस गोड व्हावा.आता मी निश्चिंत होऊन विश्रांती पावलो आहे,आता सर्व प्रकारची हाव संपली आहे.मला तर याचेच मोठे कवतुक वाटते कि या हरीचे मंगल नाम मी सदैव घेतले त्या निमित्ताने मला आत्ता प्राप्त झालेले सध्या आणि माझी अवस्था याबद्दल असून मला जास्त कौतुक वाटत आहे पूर्वी मला हरिनाम घेण्याची वेड नव्हते त्या वेळेची अवस्था आणि आता हरिनामाने प्राप्त झालेली अवस्था याचे मला जास्त कौतुक वाटते आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मुक्तीशी लग्न केले आहे,उरलेले काही दिवस खेळी मेळी घालवायचे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

याजसाठी केला होता – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.