निवडोनि वाण काढिले – संत तुकाराम अभंग – 761
निवडोनि वाण काढिले निराळे । प्रमाण डोहळे यावरी ते ॥१॥
जयाचा विभाग तयासीच फळे । देखणें निराळें कौतुकासी ॥ध्रु.॥
शूर तो ओळखे घायडायहात । येरां होईल मात सांगायाची ॥२॥
तुका म्हणे माझी केळवते वाणी । केला निजस्थानीं जानवसा ॥३॥
अर्थ
भक्तीचे अनेक प्रकार आहेत,ते निवडून काढावे व ज्याला ज्या प्रकारची आवड आहे त्याने त्याचा स्वीकार करावा.ज्याची जशी भक्ती असेल तसी त्याला फळाची प्राप्ती होईल,कवतुकाने पाहणाऱ्यास त्याला त्याचा आंनद मिळणार नाही.जो वीर असतो त्याला युद्धातील सर्व डाव पेच हे माहित असतात,इतरांना ती केवळ एक सांगण्यापूरती असते.तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी नवीन लग्न झालेल्या वधू प्रमाणे आहे नीज स्वरूपरुपी नवीन घरात राहण्याचा तिने निश्चय केला आहे,म्हणून मी जे काही बोलतो ते श्री हरीच्या कृपेने.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
निवडोनि वाण काढिले – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.