राम राज्य राम प्रजा – संत तुकाराम अभंग – 760
राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एकचि सकळ दुजें नाहीं ॥१॥
मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंडचि खाणी एकी रासी ॥ध्रु.॥
मोडलें हें स्वामी ठायाठाव सेवा । वाढवावा हेवा कोणा अंगें ॥२॥
तुका म्हणे अवघें दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हेचि आतां ॥३॥
अर्थ
आता हे सर्व राज्य रामरूप झाले आहे,सर्व प्रजा रामरूप झाली आहे,सर्वत्र राम रूपच आहे,हे सगळे एकच आहे दुसरे काही नाही.माझी वाणी हि एक हरिनाम रूपी माल वाटणारी खान झाली आहे त्यामधून फक्त हरिरूप मंगळ वाणी प्रकट होत आहे.या अवस्थेमुळे “मी दास व तो स्वामी” हा भाव हि नाहीसा झाला,आता कशाची इच्छा वाढवावी?तुकाराम महाराज म्हणतात आता सर्व जग हे ईश्वर रूप बनले आहे त्यामुळे माझ्या अंतःकरणातून फक्त हरीचे प्रेम बाहेर पडते व तेच मी गातो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
राम राज्य राम प्रजा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.