ऐसिया संपत्ती आम्हां – संत तुकाराम अभंग – 759

ऐसिया संपत्ती आम्हां – संत तुकाराम अभंग – 759


ऐसिया संपत्ती आम्हां संवसारी । भोगाचिया परि काय सांगों ॥१॥
काम तो कामना भोगीतसे देवा । आलिंगणे हेवा चरण चुंबीं ॥ध्रु.॥
शांतीच्या संयोगें निरसला ताप । दुसरें तें पाप भेदबुद्धी ॥२॥
तुका म्हणे पाहें तिकडे सारिखें । आपुलें पारिखें निरसलें ॥३॥

अर्थ

आम्हाला या संसारात अमाप संपत्ती लाभली आहे ती संपत्ती म्हणजे या विठ्ठलाचे प्रेम आहे,त्याचे आम्ही आंनदाने भोग घेत आहो.याचे वर्णन कसे करावे?आमच्या सर्व कामना इच्छा देवाचे भोग घेत आहेत,त्या विठ्ठला आम्ही आलिंगन देऊन त्याच्या चरणाचे आम्ही चुंबन घेतो.आमची वृत्ती शांत झाली आहे त्या योगे आमचा ताप निरसला आहे व पापाचे निरसन होऊन आमची सर्व भेद बुद्धी संपली आहे.तुकाराम महाराज म्हणतात जिकडे पाहवे तो विठ्ठलच तिकडे दिसतो त्यामुळे आमचे व परक्याचे हे भेदच संपून गेले आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

ऐसिया संपत्ती आम्हां – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.