अनुभवें अनुभव अवघाचि – संत तुकाराम अभंग – 758
अनुभवें अनुभव अवघाचि साघिला । तरि स्थिरावला मन ठायीं ॥१॥
पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥ध्रु.॥
एकचि उरलें कायावाचामना । आनंद भुवनामाजी त्रयीं ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥३॥
अर्थ
अनुभवाने( संत संगतीने हे समजले की सर्व भूत मात्रा देवाचे स्वरूप आहे) सर्व अनुभव साधला(सर्व जगात हरिरूप आहे) म्हणून मन एक जागी स्थिरावले.हिणकस सोने मुशीत घालून गरम केले जाते त्यामुळे हिणकस पणा नाहीसा होऊन शुध्द सोनेच उरते.त्याच प्रमाणे आम्हीही तापून निघालो आहे आता फक्त काया,वाचा,मन हेच उरले आहे.आता फक्त आंनद उरला आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या विठोबाचे फक्त दास म्हणून उरलो आहोत म्हणून आम्ही संसार जिंकला आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
अनुभवें अनुभव अवघाचि – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.