त्रिपुटीच्या योगें – संत तुकाराम अभंग – 756

त्रिपुटीच्या योगें – संत तुकाराम अभंग – 756


त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणां जोगें । एक जातां लागें । एक पाठीं लागतें ॥१॥
मागें पुढें अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ । कृपे खांदां हरी वाहे ॥ध्रु.॥
पापपुण्यात्म्याच्या शक्ती । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती । तेथें सत्तानायका ॥२॥
तुका उभा पैल थडी । तरि हे प्रकार निवडी । घातल्या सांगडी । तापे पेटे हाकारी ॥३॥

अर्थ

त्रिपुटीच्या योगाने हे जग चालते.या चक्रात जो कोणी गुंतला,तर तो एकातून सुटला की दुसऱ्या चक्रात गुंततो.मागे पुढे काळ वाट पाहत आहे,त्यातून पळून जाणे फार अवघड आहे,पण जर अंतःकरणापासून विठ्ठलाचे नाव घेतले,तर तो आपल्यावर कृपा करून आपला भार वाहून नेतो.पाप पुण्याच्या शक्ती या देवानेतर योजल्या आहेत,म्हणून त्याला सर्व काकुळती येऊन सर्वभावे त्या सत्तानायकाला शरण जावे.तुकाराम महाराज म्हणतात मी पहिलेच या भाव सागरातून तरलो आहे,या भवसागरात हे बुडतील म्हणून मी त्यांना तरण्या साठी हरीनामरूपी सांगड,तराफा व पेट्या देऊन लोकांना हाक मारत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

त्रिपुटीच्या योगें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.