अभक्त ब्राम्हण जळो – संत तुकाराम अभंग – 755

अभक्त ब्राम्हण जळो – संत तुकाराम अभंग – 755


अभक्त ब्राम्हण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु.॥
ऐसा हा निवाडा जालासे पुराणीं । नव्हे माझी वाणी पदरींची ॥२॥
तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥३॥

अर्थ

अभक्त ब्राम्हण असेल तर त्याच्या तोंडाला आग लागो,त्याच्या आईने तरी त्याला का जन्म दिला असेल?जर एखादा वैष्णव चांभार असेल तर त्याचि माता शुध्द असून त्याचे संपूर्ण सर्व कुळ शुध्द असते.माणसाचे हृदय हे शुध्द पाहिजे हे मी सांगत नसून त्याचा निवडा हा पुराणतच झालेला आहे.तुकाराम महाराज म्हणतात जे स्वतःला मोठे म्हणतात अश्या या थोरपणाला आग लागो,आणि ते दृष्ट माझ्या समोर कधीही दिसू नये.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

अभक्त ब्राम्हण जळो – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.