जळे माझी काया – संत तुकाराम अभंग – 752

जळे माझी काया – संत तुकाराम अभंग – 752


जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥१॥
पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ध्रु.॥
फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥२॥
घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें काहीं न चले येथें ॥३॥
तुका म्हणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥४॥

अर्थ

हे केशवा माझ्या शरीराला वानवा लागला आहे तू लवकर धावत ये.माझ्या शरीराची कांती व तेज हे जळू लागले आहे,माझ्या शरीराचा दाह होत आहे तो मला सहन होत नाही.अरे पांडुरंगा माझ्या शरीराचे आता फुटून दोन भाग होऊ लागले आहेत,आणि हे केशव तू अजून माझे हृदय काय पाहतोस?तू दाह शांत करण्यासाठी पाणी घेऊन लवकर ये,तुझ्या वाचून येथे कोणाचे काहीच चालणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात तूच माझी जननी आहे मग तुझ्यावाचून कोण माझे रक्षण करणार?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जळे माझी काया – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.