वेदपुरुष तरि नेती कां – संत तुकाराम अभंग – 751

वेदपुरुष तरि नेती कां – संत तुकाराम अभंग – 751


वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥१॥
तुझीं वर्में तूचि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ध्रु.॥
यज्ञाचा भोक्ता तरि कां नव्हे सांग । उणें पडतां अंग क्षोभ घडे ॥२॥
वससील तूं या भूतांचे अंतरीं । तरि कां भेद हरी दावियेला ॥३॥
तपतिर्थाटणें तुझी मूर्तीदान । तरि कां अभिमान आड येतो ॥४॥
आतां क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनियां हाका उभा द्वारीं ॥५॥

अर्थ

हे देवा तुम्ही तर साक्षात वेद रूप आहात तरी हि तुम्हाला “नेती नेती” या शब्दाने जगापेक्षा वेगळे का बरे केले?हे अनंता तुझे जे काही वर्म आहेत ते तूच दाखविले आहे,मग हे वर्म दाखवून तू कोणत्या गुणांमुळे नेणता होतोस?तू तर यज्ञाचा भोक्ता आहेस,मग तो यज्ञ का पूर्ण होत नाहि?त्यात काही उणे असल्यावर क्षोभ का होतो?हे देवा तू सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी वसतोस मग हा भेद का निर्माण केलास?तप करणे,तीर्थाटन करणे,दान करणे हे जर सर्व तुझीच मूर्ती आहेत मग हे सर्व करणारे लोकांच्या मानत अभिमान का निर्माण होतो?तुकाराम महाराज म्हणतात आता मला क्षमा करावी देवा कारण हि सर्व गाऱ्हाणी मी तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्या दारात उभा राहून मी तुम्हाला विनंती करत आहे व हाक मारत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

वेदपुरुष तरि नेती कां – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.