गौळीयाची ताकपिरें ।
कोण पोरें चांगलीं ॥१॥
येवढा त्यांचा छंद देवा ।
काय सेवा भक्ती ते ॥ध्रु.॥
काय उपास पडिले होते ।
कण्याभोंवते विदुराच्या ॥२॥
तुका म्हणे कुब्जा दासी ।
रूपरासी हीनकळा ॥३॥
अर्थ
गोकुळातील गवळ्यांची ताक-दूध पीणारी मुले मनाने चांगली होती .म्हणून प्रत्यक्ष श्रीकृणाला त्यांच्याशी नाते जुळवायला आवडले .विदुराघरी प्रेमाने दिलेल्या ताककण्यांचा आस्वाद घेतला ते, श्रीकृष्णला प्रेमळअन्नाची कमतरता भसली होती म्हणून नव्हे .तुकाराम महाराज म्हणतात, अत्यंत कुरूप, अष्टवक्रा कृब्जादासी तिच्या भक्तिप्रेमाने श्रीकृष्णला ती प्रिय झाली होती .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.