पाहातोसी काय – संत तुकाराम अभंग – 747

पाहातोसी काय – संत तुकाराम अभंग – 747


पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥
वरी ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥ध्रु.॥
बरवें करीं सम । नको भंगों देऊं प्रेम ॥२॥
तुका म्हणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥३॥

अर्थ

हे देवा तू काय पाहतोस तुझे चरणकमल पुढे कर.मी हात जोडून उभा आहे,तुझ्या चरणावर मला माझे मस्तक ठेऊ दे.तुझे दोन्ही पाय जोडून उभा राहा माझे प्रेम भंगू देऊ नकोस.तुकाराम महाराज म्हणतात आता चला देवा विठ्ठला मी तुमच्या अगदी समोर उभा आहे मला पाया पडू द्या.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

पाहातोसी काय – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.