मानामान किती – संत तुकाराम अभंग – 746

मानामान किती – संत तुकाराम अभंग – 746


मानामान किती । तुझ्या क्षुल्लक संपत्ती ॥१॥
जा रे चाळवीं बापुडीं । कोणी धरितील तीं गोडी ॥ध्रु.॥
रिद्धीसिद्धी देसी । आह्मीं चुंभळें नव्हों तैसीं ॥२॥
तुका म्हणे ठका । ऐसें नागविलें लोकां ॥३॥

अर्थ

हे देवा मान आणि अपमान या तुझ्या किती शुल्लक संपत्ती आहेत?ज्या लोकांना याची गोडी आहे त्या वेड्यांना ती तू देत जा.तू आम्हांला रिद्धी सिद्धी देशील पण आम्ही तसे लोभी नाहीत.तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा असे मान आणि अपमानाची संपत्ती देऊन तू किती लोकांना फसविले आहेस.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

मानामान किती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.