साजे अळंकार – संत तुकाराम अभंग – 745

साजे अळंकार – संत तुकाराम अभंग – 745


साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार ॥१॥
व्यभिचारीचा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥ध्रु.॥
शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणीं ॥२॥
तुका म्हणे जिणें । शर्त्ती विण लाजिरवाणें ॥३॥

अर्थ

जर पती त्याच्या पत्नीचा उपभोग घेत असेल तर,त्या स्त्रीचे दागिने शोभून दिसतो.परंतु तोच दागिना एखाद्या व्यभिचारिण स्त्रीने परिधान केला तर तिचा उपहास होतो.ज्याचे वागणे हि शूरत्वाचे आणि बोलणे हि शूरत्वाचे असते तो दिसतोही शूर आणि असतोही शूर.तुकाराम महाराज म्हणतात निर्धारावाचून(हरी भक्तीचा निर्धारा वाचुन) जगणे हे लाजिरवाणे जिणे आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

साजे अळंकार – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.