ऐसी जिव्हा निकी – संत तुकाराम अभंग – 744

ऐसी जिव्हा निकी – संत तुकाराम अभंग – 744


ऐसी जिव्हा निकी । विठ्ठल विठ्ठल कां न घोकी ॥१॥
जेणें पाविजे उद्धार । तेथें राखावें अंतर ॥ध्रु.॥
गुंफोनि चावटी । तेथें कोणा लाभें भेटी ॥२॥
तुका म्हणे काळ । देवाविण अमंगळ ॥३॥

अर्थ

अहो तुमची जीभ एवढी चांगले आहे तरी देखील त्या जिभेचे द्वारे तुम्ही विठ्ठल विठ्ठल असा नामोच्चार का करत नाही.ज्या विठ्ठल नाम द्वारे तुमचा उद्धार होणार आहे त्याच्यापासून तुम्ही अंतर ठेवू नका सारखे विठ्ठलाचे चिंतन तुम्ही चित्तामध्ये चालू ठेवा.अहो केवळ बोलण्यात चावट शब्द वापरल्याने काय लाभ होणार आहे.तुकाराम महाराज म्हणतात अहो तुम्ही सतत देवाचे नामस्मरण करत रहा असे जर तुम्ही केले नाही तर जो काळी तुम्ही देवाचे नामोच्चार करणार नाही तो काळ मंगळ असेल देवाच्या नामस्मरणा वाचुन वाया गेलेला वेळ म्हणजे अमंगळ आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

ऐसी जिव्हा निकी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.