वदे साक्षत्वेंसीं वाणी – संत तुकाराम अभंग – 743

वदे साक्षत्वेंसीं वाणी – संत तुकाराम अभंग – 743


वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मिश्रित ॥१॥
न लगे कांहीं चाचपावें । जातां भावें पेरीत ॥ध्रु.॥
भांडार त्या दातियाचें । मी कैचें ये ठायीं ॥२॥
सादावीत जातो तुका । येथें एकाएकीं तो ॥३॥

अर्थ

माझी वाणी हि नारायण मिश्रित झाली आहे हे मी साक्षित्वाने बोलतो.आता मला इतर कुठेही काही चाचपडत बसण्याची गरज नाही,कारण मी भक्ती भावाने उपदेशाची पेरणी करत आहे.माझे जे काही उपदेश आहेत ते सर्व भांडार हे त्या दात्याचे आहे,मी कोण तो बोलणारा?तुकाराम महाराज म्हणतात मी एकटा जरी असलो तरी सगळ्यांना परमार्थ रुपी उपदेश करत सावध करत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

वदे साक्षत्वेंसीं वाणी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.