काय ह्याचें घ्यावें – संत तुकाराम अभंग – 742

काय ह्याचें घ्यावें – संत तुकाराम अभंग – 742


काय ह्याचें घ्यावें । नित्य नित्य कोणें गावें ॥१॥
केलें हरीकथेनें वांज । अंतरोनी जाते निज ॥ध्रु.॥
काम संसार । अंतरीं हे करकर ॥२॥
तुका म्हणे हेंड । ऐसे मानिती ते लंड ॥३॥

अर्थ

कितीतरी असे लोक आहेत कि ते म्हणतात की,या देवाचे रोज रोज काय नाव घ्यावे?त्याचे गुणगान रोजच काय वर्णन करावे?हि हरिकथा व्यर्थ आहे या हरी कथेने आमची झोप दुरावते.या हरी कथेची सवय झाली तर संसारातील काम धंदा सुचत नाही,सुखोप भोग घेता येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात हरी कथेला असे म्हणारे लोक केवळ दोषी पाखंडी नालायक आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

काय ह्याचें घ्यावें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.