देवावरील भार – संत तुकाराम अभंग – 740

देवावरील भार – संत तुकाराम अभंग – 740


देवावरील भार । काढूं नये कांहीं पर ॥१॥
तहानभुके आठवण । घडे तें बरें चिंतन ॥ध्रु.॥
देखावी निंश्चिती । तोचि अंतर श्रीपती ॥२॥
वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥३॥

अर्थ

देवाच्या चरणांवर जो आपण भार टाकला आहे तो कधी काढू नये,ज्यावेळी तहान भूक लागते त्यावेळी त्याचे चिंतन होते हे चांगले आहे.त्याचे चिंतन केले नाही मग तर तो आपल्या पासून दुरावतो.तुकाराम महाराज म्हणतात देवा समोर मी हे संसारीक वैभव त्याज्य मानतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

देवावरील भार – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.