मृगजळ दिसे साचपणा – संत तुकाराम अभंग – 74
मृगजळ दिसे साचपणा ऐसें ।
खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥१॥
जाणोन कां करा आपुलाले घात ।
विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥
संचित सांगातीं बोळवणें सवें ।
आचरलें द्यावें फळ तेणें ॥२॥
तुका म्हणे शेखी श्मशान तोंवरी ।
संबंध गोवरी आगीं सवें ॥३॥
अर्थ
उन्हाच्या झळया हरणाला पाण्याप्रमाने भासतात म्हणून ते तहानलेले हरिण ऊर फोडून त्याच्या पाठीमागे धावत असते, मृगजळ हा एक भास आहे .मानविजिवन हे तसेच आहे, प्रपंचिक मनुष्य या सुखाच्या मृगजळामागे धावतो .आपले पूर्वसंचित ज्या प्रमाणे आहे त्याप्रमानेच आपल्याला जीवनातील सुखे मिळतात .तुकाराम महाराज म्हणतात, मानवी देहाचा शेवट श्मशानात होतो तेथे अग्नि, गोवर्यांशी त्याचा समंध येतो तेव्हा मानवाने नारदेहाचे सार्थक करून घ्यावे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
मृगजळ दिसे साचपणा – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.
अर्थ अजून अभ्यास पूर्ण अपेक्षित आहे