गंगा न देखे विटाळ – संत तुकाराम अभंग – 739

गंगा न देखे विटाळ – संत तुकाराम अभंग – 739


गंगा न देखे विटाळ । तेंचि रांजणींही जळ ॥१॥
अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु.॥
काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिकां लोकां ॥२॥
तुका म्हणे आगीविण । बीज वेगळे तों भिन्न ॥३॥

अर्थ

गंगेच्या प्रवाहातील पाण्याला विटाळ नसतो,परंतु तेच पाणी एखाद्या भांड्यात भरून ठेवले तर ओवळ्याच्या(अशुध्द) स्पर्शाने त्याला विटाळते.पदार्थ हा लहान असला किंवा मोठा असला तरी तो सारखा नसतो कारण त्याला थोडे बाजूला केले तर ते दुषित होऊ शकते.पृथ्वी वर अनेक प्रकारचे लोक राहतात पृथ्वीला पायरी मानून तिच्यावर चालतात,पण ती कधी भेद करत नाही पण त्याच पृथ्वीवर अनेक लोक एकत्र आले तर ते एकमेकांमध्ये जातीभेद करतात. तुकाराम महाराज म्हणतात बीज हे अग्नी पासून भिन्न असते त्यावेळी त्यामध्ये दोष पाहिला जातो,परंतु ते अग्नी रूप झाले कि त्याच दोष जातो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

गंगा न देखे विटाळ – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.