सोपें वर्म आम्हां – संत तुकाराम अभंग – 738

सोपें वर्म आम्हां – संत तुकाराम अभंग – 738


सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा ॥१॥
समाधीचें सुख सांडा ओंवाळून । ऐसा या कीर्तनी ब्रम्हरस ॥ध्रु.॥
पुढती घडे चढतें सेवन आगळें । भक्ती भाग्य बळें निर्भरता ॥२॥
उपजोंचि नये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरीदासांच्या ॥३॥
तुका म्हणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणें ॥४॥

अर्थ

हरी प्राप्ती चे अगदी सोपे वर्म आम्हाला संतानी सांगिले आहे,हाती टाळ,मुखाने हरीचे नाव व विणा हेच ते साधन आहे.कीर्तनामध्ये असे ब्रम्हरस आहे कि त्या वरून समाधी सुख ओवाळून टाकावी.या भक्ती प्रेमाच्या सेवनाने पुढे तर अगदी आनंद व निर्भयता प्राप्त होते.या भक्तीच्या आनंदाने तर चित्तात कुठल्याही प्रकारचा संदेह राहत नाही.उलट चारी मुक्ती हे हरिदासांच्या होऊन जातात.तुकाराम महाराज म्हणतात मनाला शांती लाभून त्रिविध ताप क्षणात नाहीसे होतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

सोपें वर्म आम्हां – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.