तृषाकाळी उदक भेटी – संत तुकाराम अभंग – 735
तृषाकाळी उदक भेटी । पडे मिठी आवडीची ॥१॥
ऐसियाचा बरवा संग । जिवलग संतांचा ॥ध्रु.॥
मिष्टान्नाचा योग भुके । म्हणतां चुके पुरेसें ॥२॥
तुका म्हणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥३॥
अर्थ
तृषा(तहान)लागल्यावर पाणी मिळाल्यावर जो तृप्तीचा आंनद आहे तोच आंनद मला संतांची भेट झाल्यावर घडो.ज्या प्रमाणे भुकेच्या वेळी पक्वान्नाचा लाभ होऊन बस म्हणे पर्यंत भोजन मिळते तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणेच आई आणि बळाच्या भेटीचा कळवळा असतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
तृषाकाळी उदक भेटी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.