बरवी नामावळी – संत तुकाराम अभंग – 734

बरवी नामावळी – संत तुकाराम अभंग – 734


बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी ॥१॥
जालें आम्हांसी जीवन । धणीवरी हें सेवन ॥ध्रु.॥
सोपें आणि गोड । किती अमृताही वाढ ॥२॥
तुका म्हणे अच्युता । आमुचा कल्पतरु दाता ॥३॥

अर्थ

हे देवा तुझी नामवळी बरवी आहे म्हणजे बरी आहे कारण ती सर्व महादोषाची होळी करते.आम्ही जो पर्यंत आहोत तो पर्यंत आम्ही ती नामावळी सेवन कारणार आहोत कारण ते आमचे जीवनच झाले आहे.ती अतिशय सोपी व अमृता पेक्षाही गोड आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे केशवा हे,अच्चुता कल्पतरू प्रमाणे तू आमचा दाता आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

बरवी नामावळी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.